MPSC अभ्यासक्रम (पूर्व + मुख्य)
पेपर 1 – सामान्य अध्ययन
(१) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
(२) भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.
(३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.
(४) भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन,
(५) आर्थिक व सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिकक्षेत्रातील उपक्रम इत्यादी.
(६) पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न-याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.
(७) सामान्य विज्ञान
पेपर 1 – सामान्य अध्ययन
(१) आकलन
(२) संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.
(३) तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
(४) निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.
(५) सर्वसाधारण मानसिक क्षमता
(६) मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी – इयत्ता दहावी स्तरावरील)
(७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील)
सामान्य अध्ययन :- १
भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह
- भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
- महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
- आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
- स्वातंत्र्यलढा- स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
- स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
- जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
- भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता.
- महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
- जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
- सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
- जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे.
- जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह)
- जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह).
- भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.
सामान्य अध्ययन :- २
प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह
- भारतीय संविधान- ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
- संघ व राज्ये यांची कार्ये व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने.
- विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था.
- भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना.
- संसद व राज्य विधानमंडळे संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
- कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्ये, सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका.
- स्थानिक स्वराज्य संस्था.
- लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्टे.
- विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या.
- वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे.
- विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
- विकास प्रक्रिया व विकास उद्योग-अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था,
- संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका.
- समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
- आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र / सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न.
- दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
- प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासनः- उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलू: नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
- नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
- भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.
- द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे
- विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम.
- महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.
सामान्य अध्ययन :- ३
तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह
- भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनशी संबंधीत मुद्ये, साधनसंपतीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार.
- सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या.
- सरकारी अर्थसंकल्प.
- देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान.
- प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी संबंधित मुद्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली -उद्दिष्टये, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा; शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र.
- भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
- भारतातील जमीन सुधारणा.
- अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
- पायाभूत सुविधाः ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी.
- गुंतवणूक प्रतिमाने.
- विज्ञान व तंत्रज्ञान – घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम.
- विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
- माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या.
- संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण.
- आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, लवचिक समाज.
- विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे.
- अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका.
- संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईटस्ची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध.
- सुरक्षा आव्हाने आणि सीमाक्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध.
- विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश.
सामान्य अध्ययन :- ४
नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता.
या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.
अभ्यासक्रमः
- नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
- अभिवृत्तीः घटक, संरचना, कार्य; त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध. नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.
- नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
- भावनिक बुध्दांक – संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन.
- भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
- लोक प्रशासनातील सार्वजनिक / नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी; नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सदसद विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन; शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण; आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या; निगम प्रशासन.
- प्रशासनातील सभ्यताः लोकसेवेची संकल्पना; प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
- वरील समस्यांवरील घटना अभ्यास.